उस्मानाबाद मध्ये मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर मद्य विक्री बंद !

0


मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर मद्य विक्री बंद

    उस्मानाबाद,दि.23(जिमाका):-05औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम-2020 अंतर्गत दि.01 डिसेंबर-2020 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत मतदान होणार आहे.त्यानुषंगाने मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर जिल्हयामध्ये कोरडा दिवस जाहिर करण्याबाबत निर्देश आहेत.

     त्यानुषंगाने दि.29 नोव्हेंबर-2020 रोजी सायंकाळी 5.00 वा.पासून ते 01 डिसेंबर-2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत संपुर्ण उस्मानाबाद जिल्हयात सर्व मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात याव्यात. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 कलम 54 व 54 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल,याची सर्व अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

पदवीधर मतदारांना 1 डिसेंबर रोजी विशेष नैमित्तीक रजा

 उस्मानाबाद,दि.23(जिमाका):-05औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणूक-2020चे मतदान दि.01 डिसेंबर-2020 (मंगळवार) रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 वा.पर्यंत व मतमोजणी दि.03 डिसेंबर-2020 रोजी होणार आहे.

    तरि या निवडणूकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची दिनांक 1 डिसेंबर रोजी विशेष नैमित्तीक रजा द्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.                        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top