उस्मानाबाद दि.२२ (प्रतिनिधी) - आजपर्यंतच्या कोणत्याही सरकारने पदवीधर व डॉक्टर यांची नोकरभरती केली नाही किंवा त्यांच्यासाठी विकासात्मक ठोस धोरण राबविले नाही. त्यांना केवळ मतदाना पुरते वापरून घेण्याचे काम करून वेगवेगळ्या प्रकारचे राजकारण व साटेलोटे करून पदवीधरांचे बाजारीकरण केले जात असलेले ते बाजारीकरण सत्ताधारी व विरोधक आनी थांबवावे. तसेच पदवीधरांच्या न्याय प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी या निवडणुकीत आम आदमी हा पर्याय सक्षमपणे उभा असून सक्षम उमेदवार आला निवडून द्यावे, असे आवाहन आम आदमी पार्टीचे उमेदवार डॉ. रोहित बोरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
आम आदमी पार्टीचे उमेदवार रोहित बोरकर यांच्या प्रचारार्थ येथील आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. अजित खोत, जिल्हा सचिव महेबुब उर्फ मुनन्ना शेख, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंगळे, आकाश कावळे, किरण शिंदे, उस्मान तांबोळी, सतीश कावळे व अमोल शिंदे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ बोरकर म्हणाले की, आदमी पार्टीचा संघर्ष हा सर्वसामान्यसाठी असून मराठवाड्यातील पदवीधरांसाठी व त्यांच्या विकासासाठी खंबीरपणे काम करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे. विद्यमान आ. सतीश चव्हाण यांनी पदवीधरांच्या प्रश्नासाठी करण्यात आलेल्या आंदोलनास साधा पाठिंबा देखील दिला नाही किंवा त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत असा आरोप केला. तसेच मी पदवीधरांच्या सर्व प्रश्नांमध्ये सदैव तत्पर असणारा एकमेव असून गेल्या आठ वर्षापासून पदवीधरांसाठी मी मराठवाडा जनविकास संस्थेची स्थापना करून पदवीधर, शेतकरी, महिला सबलीकरण व युवकांच्या विकासासाठी योगदान दिलेले आहे. तर मोफत शिष्यवृत्ती, मोफत शैक्षणिक मार्गदर्शन यासाठी सनशाइन एज्युकेशन फाऊंडेशनच्या माध्यमातून काम करीत असून आरोग्य विषयी सर्व सुविधा देखील उपलब्ध व्हाव्यात यासाठी आहिल्या आरोग्य हेल्पलाइनच्या माध्यमातून मराठवाडाभर काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.