गांजाचे आंतरराज्य रॅकेट उध्वस्त; 5 आरोपींच्या ताब्यातून 64.5 कि.ग्रॅ. गांजा जप्त - osmanabad police

0



गांजाचे आंतरराज्य रॅकेट उध्वस्त; 5 आरोपींच्या ताब्यातून 64.5 कि.ग्रॅ. गांजा जप्त

पोलीस ठाणे, परंडा: चिंचोली फाटा, ता. भुम येथे दि. 10.11.2020 रोजी भूम पोलीसांनी नाकाबंदी दरम्यान 19.40 वा. सु. इंडीका कार क्र. एम.एच. 06 एबी 6457 मध्ये असणाऱ्या चौघा व्यक्तींना 50.30 कि.ग्रॅ. गांजा हा अंमली पदार्थासहीत ताब्यात घेउन भुम पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी- सुभाष आण्णा पवार, रा. वांगी (खु.), ता. भुम याच्या शोधार्थ भुम पो.ठा. चे पोनि- श्री रामेश्वर खनाळ यांचे व परंडा पो.ठा. चे सपोनि- श्री राजकुमार ससाणे, पोना- खोसे, कळसाईन, काटवटे, महिला पोना- मुल्ला यांचे संयुक्त पथक परंडा हद्दीत फिरत होते.

_______________________________________________________

जाहिरात 




_______________________________________________________

            दरम्यान या संयुक्त पथकाने अंतरगाव रस्त्यावरील सुभाष आण्णा पवार याच्या घरावर दि. 12.11.2020 रोजी 17.30 वा. सु. नायब तहसीलदार- श्रीमती श्वेता अल्हाट व 2 शासकीय पंचांच्या समक्ष छापा टाकला. यावेळी सुभाष पवार याच्या घरात 22 कागदी पुडक्यांत 48.5 कि.ग्रॅ. गांजा अंगनात उभ्या असलेल्या इनोव्हा कार क्र. एम.एच. 25 एके 1777 च्या डिकीत 5 कागदी पुडक्यांत 10.8 कि.ग्रॅ. गांजा व महिंद्रा पिकअप क्र. एम.एच. 25 पी 1225 च्या पाठीमागील हौद्यातील गोपनीय कप्‌प्यात लपवलेल्या एका पिशवीतून 6 कि.ग्रॅ. गांजा असा एकुण 64.58 कि.ग्रॅ. गांजा जप्त केला. यावेळी घरात असणाऱ्या 1)सुभाष आण्णा पवार 2)रामदास आण्णा पवार 3)अमोल सुभाष पवार 4)आण्णा रामदास पवार, सर्व रा. वांगी (खु.) 5)नागेंद्रबाबु सालु जेमेल्ली, रा. विशाखापट्टनम, राज्य- आंध्रप्रदेश यांना पथकाने अटक करुन त्यांच्याविरुध्द परंडा पो.ठा. येथे एनडीपीएस कायदा कलम- 20 (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top