आर्मीत आहे. माझी निळ्या रंगाची बुलेट विक्री करायची आहे म्हणून 57,250 रुपयांची फसवणूक !

0



आर्मीत आहे. माझी निळ्या रंगाची बुलेट विक्री करायचीआहे म्हणून 57,250 रुपयांची फसवणूक

उस्मानाबाद :-  लष्करातील सैनिकाची जुनी मोटारसायकल विक्रीस असल्याची फेसबुकवरील जाहिरात बघुन महोम्मद अब्दुलहमीद शेख, रा. उस्मानाबाद यांनी ती खरेदी करण्यासाठी त्या संबंधीत व्यक्तीशी संपर्क साधला. यावर त्या व्यक्तीने, “मी सुनिल खोलकुंबे असुन आर्मीत आहे. माझी निळ्या रंगाची बुलेट क्र. एम.एच. 14 एचसी 2349 ही विक्री करायची आहे.” असे महोम्मद शेख यांना सांगीतले. समोरील व्यक्तीने सांगीतल्या प्रमाणे महोम्मद शेख यांनी गुगल पे या युपीआय प्रणाली मार्फत दि. 10 व 11.11.2020 रोजी एकुण 57,250 ₹ त्या व्यक्तीस पाठवले. या व्यवहारा दरम्यान एका अनोळखी मोबाईल क्रमांकाच्या व्यक्तीने डिलीव्हर बॉय असल्याचे भासवून महोम्मद शेख यांना वेळोवेळी फोनद्वारे संपर्क करुन ती मोटारसायकल खरेदी करण्यास व गुगल पे मार्फत पैसे पाठवण्यास प्रोत्साहन दिले. अशा मजकुराच्या महोम्मद शेख यांनी काल दि. 12.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 34 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी), 66 (डी) अन्वये आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

_________________________________________________

जाहिरात 

________________________________________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top