सावधान ; ॲमेझॉन कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रातून बोलतो ,
73,997 रुपयांची फसवणुक उस्मानाबाद मध्ये गुन्हा दाखल !
उस्मानाबाद :- अनोळखी कॉल व ॲमेझॉन कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रातून बोलतो किवा इतर कंपनीचे नावे किंवा बँके संबंधित नावे घेऊन कोणी आपल्या खात्यात संबंधित माहिती किंवा ओटीपी मागितल्यास देऊ नका कारण उस्मानाबाद शहरामध्ये अशीच एक घटना घडली आहे ज्यामध्ये एका नागरिकाला तब्बल 73 हजार 997 रुपयांची फसवणूक झाली आहे.
आम्रपाली कांबळे, रा. उस्मानाबाद यांना दि. 26.10.2020 रोजी 11.48 वा. सु. एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. कॉल करणाऱ्या समोरील व्यक्तीने आपण ॲमेझॉन कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रातून बोलत असुन, “तुम्ही परत केलेल्या पार्सलचे पैसे परत मिळतील.” असे आम्रपाली कांबळे यांना सांगुन फोनवर बोलते ठेवले. त्याने मागीतल्या प्रमाणे बँक खात्याची माहिती आम्रपाली यांनी काहीही विचार न करता त्यास दिली. त्या नंतर मोबाईल वर आलेल्या संदेशाची वाचून खात्री न करता त्यातील आम्रपाली यांनी त्या समोरील व्यक्तीस सांगीतले. या माहितीच्या सहायाने त्या व्यक्तीने आम्रपाली यांच्या बँक खात्यातील 73,997 ₹ रक्कम ऑनलाईन पध्दतीने इतर खात्यात स्थलांतरीत केली.
अशा मजकुराच्या आम्रपाली कांबळे यांनी काल दि. 06.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी), 66 (डी) अन्वये उस्मानाबाद शहरातील आनंदनगर
पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.