google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद तहसील कार्यालयाची मोठी कारवाई ; काळा बाजारात जानारा 30 मेट्रीक टन तांदूळ जप्त , गुन्हा दाखल - Action of Osmanabad Tehsil Office

उस्मानाबाद तहसील कार्यालयाची मोठी कारवाई ; काळा बाजारात जानारा 30 मेट्रीक टन तांदूळ जप्त , गुन्हा दाखल - Action of Osmanabad Tehsil Office

0




सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा 30 मेट्रीक टन तांदूळ काळा बाजारात जाणारा उस्मानाबाद तहसील कार्यालयाने केला जप्त.”


उस्मानाबाद :-  सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा 
“फक्त सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी.” असा छाप असलेली पोती अन्नधान्य वाढीव दराने काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी जात आहे. अशा खबरेवरुन उस्मानाबाद तहसील कार्यालयाच्या पथकाने येडशी टोल नाका येथे दि. 28.10.2020 रोजी. सापळा लावला होता. दरम्यान 12.00 वा. सु चालक- करशन जेठाभाई मकवाना, रा. गुजरात राज्य हा ट्रक क्र. जी.जे. 36 टी 7828 मधुन “फक्त सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी.” असा छाप असलेली 30 मेट्रीक टन तांदळाची 575 पोती हुमनाबाद (कर्नाटक) ते गुजरात राज्य असा वाहुन नेत असल्याचे आढळले होते. यावरुन नायब तहसीलदार (पुरवठा) श्री राजाराम केलुरकर यांनी दि. 06.11.2020 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन जिवनावश्यक वस्तु कायदा कलम- 3, 7 अन्वये उस्मानाबाद पोलिस ठाणे ग्रामीण येथे गुन्हा नोंदवला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top