उस्मानाबाद : धावत्या बसमधील चोरीचा पर्दाफाश, चोरीच्या सायकलसह एक पुरुष अटकेत

0




धावत्या बसमधील चोरीचा पर्दाफाश, चोरीच्या सायकलसह एक पुरुष अटकेत

उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखा: आराम बस क्र. एम.एच. 24 एटी 4500 ही दि. 27.10.2020 रोजी पहाटे 05.00 वा. सु. येडशी- लातूर रस्त्यावरील जवळा- तडवळा फाटा परिसरात आली असता धावत्या बसच्या पाठीमागील डिकीतील प्रवाशांचे साहित्य (हरक्युलस सायकल, कपड्यांच्या पिशव्या व कागदपत्रे) चोरीस गेले होते. यावरुन बस चालक- विनोद कांबळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन गु.र.क्र. 261 / 2020 भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा तपासास आहे.

            गुन्हा तपासादरम्यान स्था. गु. शा. च्या पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने चोरीस गेलेल्या सायकल व मालाचे वर्णन कळंब तालुक्यांतील खबऱ्यांना कळवून त्यातील सायकल ही परिसरात कोठे वापरली जात आहे काय ? याची गोपनीय माहिती घेण्यास सांगीतले होते. या प्रयत्नांना यश येउन पोउपनि- श्री पांडुरंग मोन, पोना- महेश घुगे, पोकॉ- अविनाश मारलापल्ले, पांडुरंग सावंत यांच्या पथकास गोपनीय खबऱ्याने माहिती दिली की, “हिरव्या रंगाची हरक्युलस रोडीओ सायकल ही बावी पारधी पिढी परिसरातील दादा लाला पवार हा वापरत आहे.” यावर पथकाने खात्री करण्यासाठी पारधी पिढी, बावी येथे आज दि. 15.11.2020 रोजी छापा टाकला असता दादा पवार हा नमूद सायकल वापरत असतांना आढळला. पथकाने त्यास ताब्यात घेउन सायकलची खात्री केली असता ती सायकल ही धावत्या बसमधून चोरीस गेलेल्या मालापैकी असल्याचे निष्पन्न झाले. उर्वरीत चोरीचा माल व गुन्हा करणारे अन्य सहकारी यांची माहिती उघड होण्याकामी त्यास जप्त सायकलसह पो.ठा.  ढोकी यांच्या ताब्यात दिले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top