उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी अपघात , गुन्हे दाखल

0

उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी अपघात 

पोलीस ठाणे, उमरगा: चालक- शिवाजी पुंडलीक चव्हाण, रा. सलगरा (मड्डी), ता. तुळजापूर यांनी दि. 21.11.2020 रोजी 15.00 वा. सु. जकेकुर चौरस्ता येथील रस्त्यावर स्विफ्ट कार क्र. एम.एच. 12 एसई 3022 ही निष्काळजीपणे, हयगईने चलवून दत्तात्रय शिवाजी गायकवाड, रा. जकेकुर, ता. उमरगा यांच्या मो.सा. क्र. एम.एच. 25 एपी 7385 ला समोरुन धडक दिली. या अपघातात दत्तात्रय गायकवाड हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या व्यंकट तुळशीराम गायकवाड, रा. जकेकुर यांनी काल दि. 22.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): चालक- अल्लाबक्श हानिफ शेख, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद यांनी दि. 13.11.2020 रोजी 01.00 वा. सु. उस्मानाबाद येथील शिवशाही ढाब्यासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर मो.सा. क्र. एम.एच. 25 एई 3430 ही निष्काळजीपणे, हयगईने चालवून पायी चालत जाणारे विश्वसुंदर गुरुनाथ निकम, वय 25 वर्षे, रा. कुरणेनगर, बार्शीनाका, उस्मानाबाद यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात विश्वसुंदर निकम हे गंभीर जखमी होउन उपचारादरम्यान मयत झाले. अपघातानंतर नमूद मो.सा. चालक घटनास्थळावरुन मो.सा. सह पसार झाला. अशा मजकुराच्या गुरुनाथ विश्वनाथ निकम (मयताचे पिता) यांनी अकस्मात मृत्यु क्र. 96 / 2020 च्या चौकशीत दिलेल्या लेखी जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 304 (अ), 279, 338 आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, बेंबळी: चालक- विनोद वामन डोलारे, रा. केशेगांव, ता. उस्मानाबाद यांनी दि. 22.11.2020 रोजी 19.30 वा. सु. केशेगांव येथीर रस्त्यावर मो.सा. क्र. एम.एच. 25- 7280 ही निष्काळजीपणे, हयगईने चालवून गावकरी- हरीभाऊ भाऊराव डोलारे हे चालवत असलेल्या मोटारसायकलला पाठीमागुन धडक दिल्याने हरीभाऊ डोलारे हे गंभीर जखमी झाले आहेत. अशा मजकुराच्या हरीभाऊ डोलारे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337 आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top