पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये संचारबंदी ; गर्दी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जारी केले आदेश
सोलापूर, दि.23 : कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर व आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये उद्या, मंगळवार (दि. 24) रात्री 12.00 वाजल्यापासून ते 26 नोव्हेंबरच्या रात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले.
कार्तिक वारीसाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. वारी कालावधीत पंढरपुरात भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने, संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने पंढरपूर शहरात आणि शहराच्या आजूबाजूला असलेल्या भाटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी
आदेश खालील बाबींना लागू होणार नाहीत
1. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरविणारी खाजगी/सरकारी रूग्णालये, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व वैद्यकीय सेवेशी संबंधित कर्मचारी आणि त्यांची वाहने.
2. ॲम्ब्युलन्स सेवा आणि सारी, आयएलआय आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसंदर्भात सर्वेक्षण करणारे अधिकारी/कर्मचारी.
3. जीवनाश्यक सेवेतील आस्थापना
4. मंदिर समिती पंढरपूर यांच्याकडील पासधारक अधिकारी/ कर्मचारी
5. कर्तव्यावर असणारे महसूल, पोलीस, पाणीपुरवठा, अग्
6. पोलीस बंदोबस्तासाठी भोजनालय, पाणीपुरवठा सुविधा पुरवणाऱ्या यंत्रणा.
7. कार्तिकवारी कालावधीमध्ये परंपरेनुसार साजरे होणारे उत्सव यांना स्थानिक परिस्थितीनुरुप परवानगी देण्याचे अधिकारी राखून ठेवण्यात येत आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती किंवा संस्था भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि इतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.