नवोदय विद्यालयात शिक्षिका पदावर नियुक्ती मिळाल्या बाबत फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समिती तर्फे पुजा अनुरथ नागटिळक यांचा सत्कार

0


नवोदय विद्यालयात शिक्षिका पदावर नियुक्ती मिळाल्या बाबत फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समिती तर्फे पुजा अनुरथ नागटिळक यांचा सत्कार..

उस्मानाबाद :- उस्मानाबाद शाहु नगर येथील केंद्रीय प्रमुख शिक्षक अनुरथ नागटिळक यांची मुलगी पुजा अनुरथ नागटिळक यांना केंद्रीय जवाहरलाल नवोदय विद्यालय, नवसारी गुजरात येथे शिक्षिका या पदासाठी निवड झाल्याने दि.07 नोव्हेंबर 1900 रोजी महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेतील प्रवेश दिनाचे म्हणजेच विद्यार्थी दिनाचे औचित्य साधुन फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी जे सामर्थ्य दाखविले आणि संविधान कर्तै डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे अधिकार हक्क दिले त्यामुळेच स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात सन्मानाने जगत आहे.. भाकरीला जितके महत्त्व देता तितकेच महत्त्व शिक्षणाला द्या हा विचार अंगिकारल्यास यश नक्कीच मिळते.पुजाचा गौरव करतानाच तिच्या आई वडिलांचाही गौरव करुन भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.याय प्रामुख्याने फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे गणेश रानबा वाघमारे, धनंजय वाघमारे,बाबासाहेब बनसोडे,संजय गजधने,संग्राम बनसोडे,बापु कुचेकर,रमेश कांबळे, नागनाथ गोडसे,अशोक बोराडे,संपत शिंदे अन्य मान्यवर उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top