महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढलेली नवीन आदेश
कन्टेंन्मेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रात
मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक
उस्मानाबाद,दि.6(जिमाका):-महाराष्ट्र शासनाने 'महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम, 2020 प्रसिद्ध केले असून करोना विषाणुमुळे (COVID-19)उद्धवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
महाराष्ट्र शासनाने कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी दि.30नोव्हेंबर-2020 पर्यंत वाढविला आहे व लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाने कन्टेन्मेंट झोन (Containment Zone) च्या बाहेरील क्षेत्रामध्ये ठराविक उपक्रम/बाबी पुन्हा चालू करण्याबाबत पारित केलेल्या आदेशामध्ये दुरुस्ती व आदेशात काही बाबींचा समावेश करणेबाबत आदेश पारित केला आहे.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील करोना विषाणु (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने आदेशान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन आदेशान्वये जारी करण्यात आलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये दुरुस्ती व या आदेशात नमूद खालील बार्बीचा समावेश करणेबाबत याद्वारे आदेश पारित करित आहे.
या आदेशापासून जिल्हयातील कन्टेन्मेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूं (जलतरणपटू) च्या प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे जलतरण तलाव चालू करण्यास परवानगी राहील. याबाबत महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय तसेच युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून जारी करण्यात येणा-या प्रमाणित कार्यपद्धती (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच सामाजिक अंतर व कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील.
या आदेशापासून जिल्ह्यातील कन्टेन्मेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रात योगा प्रशिक्षण संस्था चालू करण्यास परवानगी राहील. याबाबत महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून जारी करण्यात येणा-या प्रमाणित कार्यपद्धती (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच सामाजिक अंतर व कोविङ-19 च्या प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील.
या आदेशापासून जिल्हयात शारिरीक अंतर व निर्जतूकीकरणाचे उपाययोजनांचा अवलंब करून सर्व बंदिस्त जागेतील क्रीडाप्रकार उदा. बॅडमिंटन (badminton), टेनिस (tennis), स्क्वॅश (squash),बंदिस्त जागेतील निशानेबाजी (Indoor shooting ranges) इ. चालू करण्यास परवानगी राहील. तसेच सामाजिक अंतर व कोविड-19 घ्या प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील.
या आदेशापासून जिल्हयातील कन्टेंन्मेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रात सिनेमा हॉल/चित्रपटगृहे/मल्टीप्लेक्स/नाट्यगृहे त्यांच्या आसनक्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने चालू करण्यास परवानगी राहील.सिनेमा हॉल/नाट्यगृहे/मल्टीप्लेक्स/नाट्यगृहे यामध्ये कोणत्याही खादयपदार्थांना परवानगी असणार नाही.संस्था चालू करण्यास परवानगी राहील.याबाबत महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक कार्य विभाग आणि स्थानिक प्राधिकरण तसेच माहिती व प्रसारण मंत्रालय,भारत सरकार यांचेकडून जारी करण्यात येणाऱ्या प्रमाणित कार्यपध्दती (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच सामाजिक अंतर व कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील.
*****