google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वतीने ढोकी येथिल सुरवसे कुटुंबास मदतीचा हात -osmanabad

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वतीने ढोकी येथिल सुरवसे कुटुंबास मदतीचा हात -osmanabad

0
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वतीने ढोकी येथिल सुरवसे कुटुंबास मदतीचा हात

उस्मानाबाद :- ढोकी (लातूर रोड, पेट्रोल पंप परिसर) ता.उस्मानाबाद येथिल श्री.गणपत सुरवसे यांच्या राहत्या घरावर दि. 10 नोव्हेंबर 2020  रोजी संध्याकाळी 10.50 वा. दुर्दैवी दुर्घटना झाली. त्यात त्यांचे आई वडील श्री. प्रकाश बाबुराव सुरवसे व सौ. मद्रिका प्रकाश सुरवसे यांचे जागीच दुर्दैवी निधन झाले. मुलगा कु.आकाश गणपत सुरवसे (वय: 5 वर्ष) याचे मेंदूस जबर इजा झाली. त्याच्यावर दवाखान्यात उपचार झाले. यामध्ये संपूर्ण कुटुंब, संसार मोडून पडलेला, आर्थिक परीस्थिती बेताची,  मानसिक आधाराशिवाय कोणताही म्हणावा तसा आधार नव्हता. 

याची खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांत्वनपर भेट व पाहणी वेळेस मदत करतो असे आश्वासन दिले होते. त्याअनुषंगाने आज दि.24 नोव्हेंबर रोजी फुल ना फुलांची पाकळी म्हणून घर बनवण्यासाठी शेडला लागणारे सर्व साहित्य (पत्रे, अँगल स्टील) पोच करण्यात आले. याबद्दल सुरवसे परिवाराने खासदार साहेबांचे आभार मानले.

यावेळी शिवसेना जेष्ठ मार्गदर्शन भारत काका देशमुख, उद्धव आण्णा समुद्रे, समद शेख, पं.स.सदस्य संग्राम देशमुख, विभाग प्रमुख गुणवंत पापा देशमुख, पै.तालुका अध्यक्ष सतीश (पप्पू) वाकुरे, तिर्थराज घाडगे, माजी सभापती दगडू धावारे, पोलिस पाटील राहुल वाकुरे, सामना पत्रकार अरुण देशमुख, नवाज भाई पठाण, शिवसेना शाखा अध्यक्ष संतोष कंदले, सुभाष गाढवे, राजाभाऊ माळी, हसन शेख, शकील शेख, शाकिर वस्ताद, महादेव भोसले पिंटू तावरे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top