google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 सकारात्मक मानसिकता व आनंदाने निवडणूक कर्तव्ये पार पाडा ---मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड

सकारात्मक मानसिकता व आनंदाने निवडणूक कर्तव्ये पार पाडा ---मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड

0
सकारात्मक मानसिकता  व आनंदाने निवडणूक कर्तव्ये पार पाडा  ---मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड
 
*सखोल अभ्यास आणि अचूक माहिती आत्मविश्वाची गुरुकिल्ली
 
   *अधिका-यांनी एकसंघ होवुन जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडावीत
 
             उस्मानाबाद,दि.24(जिमाका):-पदवीधर मतदारसंघ निवडणूक यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी नियुक्त केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी कामाचा ताण न घेता परंतु जबाबदारीने व सकारत्मक मानसिकतेने निवडणूक कर्तव्ये पार पडावे. निवडणूकीच्या कामामध्ये काही अधिकारी आनाश्वयक ताण घेतात व त्यामुळे त्यांच्याकडून चुका होतात,ताण परिस्थितीमुळे नव्हे तर मानसिकतेमुळे येतो.त्यामुळे आनंदाने व हासत खेळत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडव्यात असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी आज उस्मानाबाद येथे केले.
     आज ते नगर परिषद नाटयगृह येथे मतदान केंद्र अध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणाच्यानिमित्त आयोजीत शिबीराच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद योगेश खरमाटे,उस्मानाबादचे  तहसिलदार गणेश माळी,तुळजापूरचे तहसिलदार सौदागर तादळे, विभागीय आयुक्त कार्यालयाचे श्री.घोटे तसेच नियुक्त झोनल अधिकारी,केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकारी  उपस्थित होते.
  पुढे बोलताना डॉ.फड म्हणाले की,निवडणुकीचे काम हे राष्ट्हीताचे असून या कामाची संधी मिळाल्यामुळे आपण भाग्यावान आहोत.या संधीचा लाभ घेवुन मनमोकळपणाने काम करा आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपले योगदान द्या.असेही त्यांनी सूचित केले.
   अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले म्हणाल्या की, मतदान केंद्रावरील प्रत्येक अधिकारी सक्षम प्राधिकारी असल्यासारखा असतो.त्यांना निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकाराचा अचुकपणे व जबाबदारीने उपयोग करावा.प्रत्येकाने आपल्या कामाविषयी पुर्ण माहिती घेणे आणि त्याबाबतचा अभ्यास करणे  अत्यंत आवश्यक आहे.आपले ज्ञान व अभ्यासामुळे मतदानाच्या दिवशी आत्मविश्वास मिळेल आणि दिलेल्या जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडण्यास मदत होईल.
    उपजिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना म्हणाले की,आपण लोकसभा व विधानसभा निवडणुकामध्ये अतिशय चांगले  काम केले आहे.त्याचप्रमाणे या निवडणुकीतसुध्दा व्यवस्थीत व जबाबदारीने कर्तव्य बजावीत.प्रत्येक केंद्रावरील सर्व अधिकाऱ्यांनी एकसंघ होवून आपल्याकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडावे.
      कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्यविषयक सुरक्षेच्या नियमांचे पालन करीत निवडणुक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडावयाची आहे.मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.पुरुष मतदार व स्त्री मतदार तसेच दिव्यांग यांच्यासाठी तीन स्वतंत्र्य रांगा व दोन मतदारामधील सामाजिक अंतर 6 फुटाचे ठेवावे.यासाठी गोल वर्तुळे चिन्हांकित करावीत.मतदान केंद्रापासून 200 मीटरचे अंतर चुना फक्की पावडरने चिन्हांकित करावे.मतदान केंद्रापासून 200 मीटरच्या आत प्रचार साहित्य असल्यास ते काढुन टाकावे.मतदान  केंद्रामध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांचे फोटो किंवा चिन्हा असल्यास ते काढून टाकावे अथवा झाकून टाकावे.मतपत्रिकेतील नावांसमोरील जागेत मतदार पसंती क्रमांक अंकात लिहावयाचा आहे.ते आकडे मराठी,इंग्रजी,रोमन किंवा भारतीय घटनेतील आठव्या अनुसूचीमध्ये दिलेल्या कोणत्याही भारतीय भाषेतील अंकात लिहिण्यास मुभा आहे.भारतीय निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार निवडणुकीसाठी मतपत्रिकेवरील नोटा हा पर्याय वगळण्यात आला असल्याचे त्यांनी सांगीतले.निवडणुक नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या मतदान केंद्राचे सर्व साहित्य योग्य असल्याची खात्री करुन घ्यावी.संबंधित कर्मचाऱ्यांनी साहित्य घेवून नेमून दिलेल्या वाहनांद्वारे पोलीस कर्मचाऱ्यासह 30 नोव्हेंबर-2020 रोजी मतदान केंद्रावर जावयाचे आहे.निवडणुक कामाकाजातील अधिकारी व कर्मचारी यांची सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वोपतरी काळजी घेण्यासाठी,प्रत्येाक मतदान केंद्रावर सॅनिटायझर,स्वच्छ पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात यावी.तसेच सर्व मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करुन घ्यावे.शहरीभागातील मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण नगरपालिकेने तर ग्रामीण भागातील मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने करुन घ्यावे,अशा सूचनाही प्रताप काळे यांनी यावेळी दिल्या.
       तत्पूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयाचे श्री.घोटे यांनी प्रशिक्षणार्थींना पी. पी. टी.द्वारे तर तहसिलदार गणेश माळी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आदर्श मतदान केंद्राची मांडणी, मतपत्रिका घडी करणे, मतदान अधिकारी यांची कामे,आक्षेपित मत, केंद्राध्यत्यांची दैनंदिनी प्रदान मतपत्रिका, मतदान समाप्त करणे.मतदानानंतर मतपेटी सील करणे,मतपत्रिकांचा हिशोब लिफाफे मोहरबंद करणे आणि मतपेटी हाताळण्यासाठी प्रात्याक्षिके देण्यात आली.
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top