येडोळा येथील बोरी नदीवर पुलाचा काही भाग वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा अनेक समस्यांशी सामना
उस्मानाबाद :- जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेती सह गावांना जोडणारा मुख्य रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
येडोळा ता . तुळजापूर येथील येथे दि .१३ व १४ ऑक्टोबर २०२० रोजी सतत दोन दिवस झालेल्या ढगफुटीगत मुसळधार पावसामुळे बोरी नदीला महापूर आल्याने या नदीवरील के.टी. बंधारा उद्धवस्त झाल्याने येडोळा ग्रामस्थांचा येडोळा - नळदुर्ग येण्या - जाण्याचा संपर्क कायमरवरूपी तुटला आहे . के.टी. बंधान्यावरून नळदुर्ग - अक्कलकोट हा या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा २ किमी अंतराचा येडोळा पाटी - येडोळा गावाला जोडणारा मुख्य रस्ता के.टी. बंधारा पडल्यामुळे बंद झाला आहे . नदीला आलेल्या महापुरामुळे बंधाराच्या पूर्व - पश्चिम या दोन्ही बाजूस मोठे खड्डे पडून पूर्ण बंधाराच उद्धवस्त झाला आहे . त्यामुळे येथील ग्रास्थांना दैनंदिन व्यवहाराकरिता तसेच तहसील कार्यालय तुळजापूर , जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबादला कार्यालयीन कामाकाजीसाठी नळदुर्गलाच यावे लागते . येडोळा पाटी- येडोळा बोरी नदीपर्यंत २ किमी रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे . के.टी. बंधारा हा या रस्त्याला व गावाला जोडणारा महत्त्वाचा बंधारा होता परंतु महापुरामुळे हा बंधारा उद्धवस्त झाल्याने येथील ग्रामस्थांचा येडोळा - नळदुर्ग येण्या - जाण्याचा संपर्क तुटला आहे त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व ग्रामस्थांना दैनंदिन व्यवहारासाठी येडोळा - नळदुर्ग येण्या - जाण्या करिता मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झाली आहे.
तसेच अनेक शेतकऱ्यांचे शेतातील ऊस काढणीला आले आहेत मात्र रस्ता नसल्याने ते ऊस त्याठिकाणी कारखान्याला न जाता शेतात पडून आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
येडोळा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना 3 नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे या कामांची दुरुस्ती व्हावी यासाठी निवेदन दिले आहे मात्र अद्यापही काही काम न झाल्याने गावातील शेतकऱ्यांना , ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.