उस्मानाबाद जिल्ह्यात 2 ठिकाणी अपघात , गुन्हे दाखल
पोलीस ठाणे, मुरुम: चालक- मौलाअली शेख रा. आष्टा कासार ता. लोहारा यांनी दि. 29/11/2020 रोजी
आष्टा कासार–मुरुम रस्त्यावरील आष्टा कासार शिवारात ट्रॅक्टर क्र. एम. एच. 25 एच. 3239 हा निष्काळजीपणे चालवला. यावेळी ट्रॅक्टरला जोडलेल्या तिफणीचा फटका रस्त्यावरुन जाणारे गावकरी- हारुण पटेल यांच्या डोक्यात लागल्याने त्यांचा मृत्यु झाला. अशा मजकुराच्या अफसर पटेल यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरुन दि. 17.12.2020 रोजी भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, परंडा: चालक- रामचंद्र तवटे रा. डोंजा ता. परंडा यांनी दि. 07/11/2020 रोजी परंडा–सोनारी रस्त्यावरील विद्युत उपकेंद्रासमोर मो. सा. क्र. एम. एच. 25 एबी. 4930 ही निष्काळजीपणे चालवल्याने घसरली. या अपघातात रामचंद्र तवटे यांचा मृत्यु झाला. अशा मजकुराच्या रोहीत तवटे यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरुन दि. 17.12.2020 रोजी भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.