उस्मानाबाद जिल्ह्यात 3 ठिकाणी मारहाण मारहाण , गुन्हे दाखल
* पोलीस ठाणे, ढोकी: मनोजकुमार उत्तम राउत, रा. वाघोली हे त्यांच्या भाउजईसह दि. 24.12.2020 रोजी 09.00 वा. हिंगळजवाडी येथील स्वत:च्या शेतात होते. यावेळी शेता शेजारच्या बालाजी देविदास जाधव व वैशाला शरद अपसरे, दोघे रा. हिंगळजवाडी, ता. उस्मानाबाद यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन मनोजकुमार यांना दगडाने मारहाण करुन जखमी केले तर त्यांच्या भाऊजईस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मनोजकुमार राउत यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
* पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन जोसिफ दिगंबर भारती, शाम दिगंबर भारती, दोघे रा. हणुमान चौक, बार्शी रोड, उस्मानाबाद यांनी दि. 23.12.2020 रोजी 20.45 वा. गल्लीतीलच आकाश सतिश परशे यांना त्यांच्या राहत्या घरासमोर शिवीगाळ करुन लाखंडी गजाने, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच कुटूंबासह ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या आकाश परशे यांनी काल दि. 24.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
* पोलीस ठाणे, कळंब: मुद्रीका शिवाजी गिरी, रा. लक्ष्मीनगर, कळंब या दि. 24.12.2020 रोजी 14.00 वा. राहत्या घरी होत्या. यावेळी शेतजमीनीच्या वादावरुन त्यांचे नातेवाईक- सुनिता गिरी, अनिता भारती, विजयाबाई भारती, तीघी रा. अहमदपुर, जि. लातुर यांनी मुद्रीका गिरी यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन मारहाण केली. अशा मजकुराच्या मुद्रीका गिरी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.