उस्मानाबाद जिल्ह्यात 4 ठिकाणी चोरी गुन्हे दाखल

0
उस्मानाबाद जिल्ह्यात 4 ठिकाणी चोरी गुन्हे दाखल

पोलीस ठाणे, परंडा: अनिकेत पाटील, रा. वाणेवाडी, ता. परंडा यांनी दि. 19/12/2020 रोजी दुपारी 01.00 वाजता आपली हिरो पॅशन प्रो मो. सा. क्र. एम. एच. 25 एएफ 5764  ही वाणेवाडी शिवारातील गंगाधर स्वामी महाराज मठाचे समोर लावली असतांना अज्ञात चोरट्याने चोरली आहे. अशा मजकुराच्या अनिकेत धनाजी पाटील यांनी दि. 21.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, बेंबळी: केशेगाव ता. उस्मानाबाद येथे दिनेश प्रकाश गुरव रा. केशेगाव कारखाना कॉलनी यांचे राहते घराचे कडी-कोयंडा तोडुन घरातील सोन्या-चांदीचे दागीने 92,500 रु. चे दि. 21/12/2020 ते  दि. 21.12.2020 दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या दिनेश प्रकाश गुरव यांनी आज दि. 21.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, कळंब: सत्तार सुलेमान शेख रा. शेरेगल्ली, कळंब ता. कळंब यांचे राहत्या घराचे उघड्या दरवाजातुन घरात घुसुन अज्ञात चोरट्रयाने टेबला वरील मोबाईल दि. 20/12/2020 ते  दि. 21.12.2020 दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरला आहे. अशा मजकुराच्या सत्तार सुलेमान शेख यांनी दि. 21.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, कळंब: सुर्यकांत नागनाथ थळकरी रा. गांधी नगर, कळंब ता. कळंब जलाराम ट्रेडर्स दुकानाच्या समोर आठवडी बाजार करीत होते. यावेळी त्यांचे खिशातील मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरले आहे. अशा मजकुराच्या सुर्यकांत नागनाथ थळकरी यांनी दि. 21.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भा. दं. सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top