उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी कारवाई , जिल्ह्यात 4 ठिकाणी छापे !
* पोलीस ठाणे, लोहारा: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन लोहारा पो. ठा. यांच्या पथकाने दि. 21.12.2020 रोजी कानेगाव येथे छापा मारला. यावेळी मारुती महाराज मंदीराचे समोर रोडवर यशपाल भानुदास माने रा. कानेगाव ता. लोहारा हा कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असताना जुगार साहित्य व 1220 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना पथकास आढळला. यावरुन नमूद आरोपी विरुध्द म. जु .का. अंतर्गत लोहारा पो. ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
* पोलीस ठाणे, नळदुर्ग: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरे वरुन नळदुर्ग पो. ठा. यांच्या पथकाने दि. 21.12.2020 रोजी नळदुर्ग येथे छापा मारला. यावेळी अक्कलकोट रोडलगत पानटपरी मध्ये इम्तियाज अहेमद फयाज कुरेशी रा. नळदुर्ग ता. तुळजापुर हा कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवित असतांना जुगार साहित्य व 710 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना पथकास आढळला. यावरुन नमूद आरोपी विरुध्द म. जु. का. अंतर्गत नळदुर्ग पो. ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
* पोलीस ठाणे, अंबी: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरे वरुन अंबी पो. ठा. यांच्या पथकाने दि. 21.12.2020 रोजी नळदुर्ग येथे छापा मारला. यावेळी लोणारवाडी ता. परंडा येथे 1. दत्ता नवनाथ किरदत्त् 2. दशरथ रावसाहेब जमदारे 3. गजेंद्र किसन खरात 4. अनिल ज्योतीराम किरदत्त् 5. भिमराव भाउराव किरदत्त् 6. सुनिल ज्योतीराम किरदत्त् 7. जगन्नाथ ज्योतीराम किरदत्त् सर्व रा. लोणारवाडी ता. परंडा 8. सोमनाथ भिमराव दैन रा. शेळगाव हे कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवित असतांना जुगार साहित्य व 4560 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना पथकास आढळला. यावरुन नमूद आरोपीता विरुध्द म. जु. का. अंतर्गत अंबी पो. ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
* पोलीस ठाणे, उमरगा: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरे वरुन उमरगा पो. ठा. यांच्या पथकाने दि. 21.12.2020 रोजी उमरगा येथे छापा मारला. यावेळी उमरगा येथील प्रभात हॉटेलच्या पाठीमागे 1. शिवायनमहा शरनाप्पा लवारे 2. शाहुली दस्तगीर शेख दोघे रा. उमरगा ता. उमरगा हे कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवित असतांना जुगार साहित्य व 1370 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना पथकास आढळले. यावरुन नमूद आरोपीता विरुध्द म. जु. का. अंतर्गत उमरगा पो. ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.