फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ.कांचन शामराव बनसोडेंचा गौरव

0
फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ.कांचन शामराव बनसोडेंचा गौरव

उस्मानाबाद :- उस्मानाबाद येथील शासकीय स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ.कांचन शामराव बनसोडेचा सत्कार गौरव फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने पुष्प गुच्छ व पेढे भरवुन करण्यात आला.डाॅ.कांचन या एम एस हि पदव्युत्तर पदवी नुकतीच उत्तीर्ण झाल्या असून त्यांना स्त्री रोग तज्ञ वर्ग -1 या पदावर जिल्हा महिला शासकीय रुग्णालयात नियुक्ती दिलेली आहे. उस्मानाबाद नगर परिषद येथील सेवानिवृत्त शामराव बनसोडे यांची ती कन्या होय.शामराव बनसोडे यांना तिन मुली असुन तिनही मुली वैद्यकीय अधिकारी असुन शामराव बनसोडे यांनी मुलींना शिक्षण देवुन ख-या रितिने फुले शाहू आंबेडकर विचारधारा पसरविली आहे,माॅ जिजाऊ,सावित्रीमाई फुले,माता रमाईच्या लेकींनी वैद्यकीय क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे.या सत्कार गौरव कार्यक्रमात प्रामुख्याने भारतीय बौद्ध महासभेच्या शिलाताई चंदनशिवे, नागनाथ गोरसे सर,राजेंद्र धावारे सर, रमेश कांबळे,बापू कुचेकर,सेवा निवृत्त शाखा अभियंता पी एस आल्टे,डॉ शिवाजी ओमन,बाबासाहेब आप्पा बनसोडे,गणेश रानबा वाघमारे,संपादक लेखक विजय बनसोडे,संग्राम बनसोडे, सोमनाथ गायकवाड, मुकेश मोटे, विनायक गायकवाड व डॉ कांचन चे आई वडिल सहित अन्य इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top