उस्मानाबाद जिल्ह्यात तीहेरी तलाक प्रकरणी गुन्हा दाखल
उस्मानाबाद :- जिल्ह्यात लोहारा तालुक्यात -
श्रीमती- अंजुम अल्ताफ सय्यद, रा. माकणी, ता. लोहारा यांना त्यांचे पती- अल्ताफ सय्यद, रा. मलकापूर, ता. कळंब यांसह सासु- सासरे, नणंद, दिर असे सासरकडील 7 लोक वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास देत असल्याने त्या माहेरी माकणी येथे राहत होत्या. दि. 11.12.2020 रोजी पती- अल्ताफसह नमूद 7 लोकांनी अंजुम सय्यद यांच्या माहेरच्या घरात घुसून अंजुम यांसह त्यांच्या आई व भावास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच पती- अल्ताफ याने पत्नी-अंजुम यांना तीन वेळा “तलाक, तलाक, तलाक” असे ओरडून सांगीतले व “आता आपला घटस्फोट झाला असुन आपला संबंध संपला.” असे धमकावले. अशा मजकुराच्या श्रीमती- अंजुम सय्यद यांनी काल दि. 12.12.2020 रोजी दिलेल्या प्रथमखबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 323, 452, 504, 506 सह मुस्लीम महिलांच्या विवाह अधिकारांचे संरक्षण कायदा कलम- 3, 4 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.