नळदुर्ग येथे अवैध गुटखा वाहतुक करणा-यावर पोलीसांनी केला गुन्हा दाखल
उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस ठाणे, नळदुर्ग: येथे अवैध गुटखा वाहतुक होत असल्याच्या गोपनिय खबरेवरुन नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. 16/12/2020 रोजी 16.25 वा. नळदुर्ग येथील बाबा ट्रेडर्स समोरील रस्त्यावर सापळा लावला. यावेळी मोहसीन जमादार हा जुपीटर स्कुटर क्र. एम. एच. 25 एपी 6838 वर महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या 03 पिशव्या गुटखा पदार्थाचे पुडके अवैधपणे बाळगलेला आढळला. पोलीसांनी तो गुटखा जप्त करुन भा.द.सं. कलम 188, 272, 273, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.