उस्मानाबाद जिल्ह्यात 4 ठिकाणी चोरी गुन्हा दाखल

0




उस्मानाबाद जिल्ह्यात 4 ठिकाणी चोरी गुन्हा दाखल 

पोलीस ठाणे, उमरगा: संजय नागणे रा. मंगल प्लॉट, उमरगा यांनी आपली होन्डा शाईन मो. सा. क्र. एम.एच. 25 एई 2258  ही दि. 14/12/2020 रोजी 21.00 वाजता आपल्या घरासमोर ठेवली होती. दुस-या दिवशी सकाळी ती मो. सा. जागेवर आढळली नाही. यावरुन ती मोटार सायकल ही  अज्ञात चोरट्याने चोरली आहे. अशा मजकुराच्या संजय नागणे यांनी दि. 17.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, उमरगा: लाडलेसाब लोहारे, रा. शासकीय दुध डेअरी मागे, उमरगा यांनी आपली  हिरो होन्डा स्प्लेंडर मो. सा. क्र. एम. एच. 25 ई 0056  ही दि. 12/12/2020 रोजी 23.00 वाजता आपल्या घरासमोर ठेवली होती. दुस-या दिवशी सकाळी ती मो. सा. जागेवर आढळली नाही. यावरुन ती मोटार सायकल ही  अज्ञात चोरट्याने चोरली आहे. अशा मजकुराच्या संजय नागणे यांनी दि. 17.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, वाशी: लक्ष्मण थोरबोले, रा. गोजवाडा, ता. वाशी हे बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्रयाने त्यांच्या घराचा कडी कोयंडा दि. 16 व 17/12/2020 रोजीच्या रात्री उचकटुन घरातील कपडे, रोख रक्कम 15,000 रु. व दागीने असा एकुण 1,00,500 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या लक्ष्मण थोरबोले यांनी दि. 17.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380, 457 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, आनंदनगर: अपुर्वा मस्के, रा. शासकीय निवासस्थान, समता वसाहत उस्मानाबाद या बाहेरगावी गेल्या असता अज्ञात चोरट्रयाने त्यांच्या घराचा मागील कडी कोयंडा दि. 22/10/2020 ते 17/12/2020 दरम्यान उचकटुन घरातील फोन, रोख रक्कम असा एकुण 13,500 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या अपुर्वा मस्के यांनी दि. 17.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380, 457 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top