फेसबुकवर मतदान करतानाचे व्हिडीओ अपलोड केल्या प्रकरणी प्रशासनाची कारवाई
उस्मानाबाद,दि.01(जिमाका):-05 औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कळंब येथील मतदान केंद्र क्रमांक 596 येथे मतदार श्री.विजय भास्कर कुरुद यांनी मतदान करतेवेळी व्हिडीओ तयार करून फेसबुक या वेबसाईटवर अपलोड केल्याप्रकरणी संबंधिताविरूध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1959 चे कलम 128 (2) भारतीय दंड सहितेच्या 188 व Conduct of Election Rule 1961 Section 39 नुसार पोलीस ठाणे कळंब येथे CR 289/20 कलम 171 (क), 188 IPC लोकप्रतिनिधीत्व अधीनियम 1951 चे कलम 128,130 व सह कलम 39 निवडणूक आचारसंहिता नियम 1969 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
असे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कळविले आहे