05 -औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात आज मतदान होत आहे व सकाळी 10 वाजेपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात 6.48% टक्के मतदान
उस्मानाबाद :- औरंगाबाद पदवीधर मतदार संघात आज 1 डिसेंबर रोजी मतदान सुरू झाले आहे व सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे व 10 वाजेपर्यंत म्हणजे 2 तासांमध्ये 6.48% टक्के मतदान झाले
आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण 74 मतदान केंद्रांमध्ये 33 हजार 632 ईतके मतदान यादी नुसार मतदान संख्या आहे.
त्यामध्ये पुरुष 26 हजार 589 , महिला 7 हजार 43 आहे .
सकाळी 10 वाजेपर्यंत 2 हजार 181 मतदार झाले व त्या मध्ये स्त्री 240 व पुरुष 1 हजार 941 अशी माहिती उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 05 - औरंगाबाद विभागीय पदवीधर मतदारसंघ 2020 यांनी प्रेसनोट द्वारे ही माहिती दिली आहे.
Covid-19 च्या अनुषंगाने सर्व मतदान केंद्रावर covid-19 यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उपाय योजना करण्यात आले आहेत व मास्क वापरणे सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे बंधनकारक केले आहे तसेच त्या ठिकाणी त्यांनी त्याचा वापर व covid-19 यांच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना सर्व केंद्रावर करण्यात आले आहेत
मतदान प्रक्रियेवर कडी नजर!
----
औरंगाबाद पदवीधरसाठी मतदान प्रक्रियेवर सीसीटीव्ही आणी जीपीआरएस प्रणाली द्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर व निवडणूक विभाग लक्ष ठेवून आहेत.
यामुळे कुठेही विस्कळीतपणा आल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.
----
छायाचित्र- राहुल कोरे आळणीकर.