उस्मानाबाद मध्ये 1 लाख 7 हजार 350 रुपयांची फसवणुक : गुन्हा दाखल
उस्मानाबाद :- पोलीस ठाणे उमरगा- बालाजी गायकवाड रा.गुगळगाव ता.उमरगा यांनी फेसबुक या सामाजिक माध्यमावर जुनी स्कुटर विक्रीस असल्याचे बघीतले . यावर त्यांनी स्कुटर विकत घेण्यासाठी त्या अज्ञात व्यक्तीशी संपर्क साधला असता सौदा निश्चीत झाला . समोरील व्यक्तीने त्यांना स्कुटर ताब्यात देण्यापुर्वी त्याने दिलेल्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले . तसे पैसे भरल्यावरही त्या समोरील व्यक्तीने स्कुटर विक्रीचे वेगवेगळे बहाणे बनवुन दि .१० / ०८ / २०२० ते दि .१६ / ०८ / २०२० रोजी दरम्यान बालाजी यांना वेळोवेळी बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले . अशा प्रकारे बालाजी यांनी त्या व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यात एकुण १,०७,३५० रू.भरले . परंतु समोरील अज्ञाताने त्यांना स्कुटर विकी केली नाही . अशा मजकुराच्या प्रथम खबरे वरून दि .२ ९ / ११ / २०२० रोजी भा.दं.सं.कलम ४२० सह मा.तं.का.कलम ६६ ( सी ) , ( डी ) नुसार गुन्हा नोंदवला आहे .