डिजिटल मीडियाला माहिती न देणार्‍या जिल्हा माहिती अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशनची मागणी - मुख्यमंत्र्यांना निवेदन -MDMA

0

अमरावती :- केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने नुकतेच डिजिटल मीडियाला मेनस्ट्रीम मीडियाच्या सारख्या सर्व सुविधा देण्याबाबत प्रसिद्धी सूचना काढलेली असून महामहीम राष्ट्रपती यांनी दि.१६ नोव्हेंबर २०२० रोजी यासंदर्भात अधिसूचना स्वाक्षरी केली आहे.

मात्र सन्माननीय अपवाद वगळता राज्यातील अनेक जिल्हा माहिती अधिकारी डिजिटल मिडिया न्युज वेबसाईट संपादक व पत्रकार यांना माहिती देण्यास टाळाटाळ करतात ,अशा प्रकारच्या बऱ्याच तक्रारी महाराष्ट्र डिजिटल मिडिया असोसिएशन कडे प्राप्त झाल्या आहे. जिल्हा माहिती अधिकारी यांची नियुक्ती जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती पुरविणे,शासनाचे निर्णय,मंत्रिमंडळाचे निर्णय,अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे दौरे,मंत्र्यांचे दौरे याबाबत माहिती पुरविण्यासाठी केलेली आहे.मात्र काही अधिकारी अपवाद वगळता अनेक अधिकारी अशा बाबतीतील कोणतीही माहिती डिजिटल मीडियापर्यंत देत नाही.डिजिटल मीडियाच्या बाबतीत संपूर्ण माहिती न घेता पूर्वग्रह दुषित टिप्पणी करत असतात.यापूर्वी माहिती संचालनालयातील जबाबदार अधिकाऱ्यांनी सुद्धा डिजिटल मीडियाच्या बाबतीत उलट-सुलट परिपत्रके काढून संभ्रम निर्माण केला आहे.अशा परिपत्रकांचा गैरवापर करून डिजिटल मीडियाच्या विरोधात सोशल मीडियामध्ये उलट-सुलट लिहून त्यांची बदनामी करण्याचे कट-कारस्थान राज्यातील काही माहिती अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही लोक करत आहेत.  
यासंदर्भात महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशनचे प्रमुख मागणी घेऊन माहिती उपसंचालक अमरावती यांचे मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनातुन करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत 

१) जिल्हा माहिती अधिकारी डिजिटल मीडियाचा संपादक व पत्रकारांना माहिती पुरवत नाहीत अशा सर्व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे.

२) शासनाच्या विविध योजना,शासन निर्णय,मंत्रिमंडळ निर्णय तसेच शासनाचे विविध परिपत्रके,मंत्र्यांचे व अधिकाऱ्यांची दौरे याबाबत माहिती महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशनच्या सभासदांना देण्यात यावी या संदर्भात तात्काळ कळवावे.

३) जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय स्तरावर डिजिटल मीडियासाठी वेगळा सेल स्थापन करावा.

४) माहिती व जनसंपर्क खात्याचा स्वतंत्र पदभार सक्षम मंत्र्याकडे देऊन डिजिटल मीडिया बाबत शासनाने धोरण स्वयंस्पष्ट करावे.

५) डिजिटल मीडियाच्या बाबतीत उलट-सुलट परिपत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

६) डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना शासकिय पत्रकार परिषदांना बोलविण्यात संदर्भात जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत.

७) तसेच यापूर्वी सुद्धा यासंदर्भात ई-मेल द्वारे पत्रव्यवहार केला असून त्यावर अद्याप कोणती उत्तर आलेले नाही याची योग्य ती चौकशी करण्यात यावी.

वरील मागण्या संदर्भात तातडीने विचार करून योग्य ती कारवाई करून महाराष्ट्र डिजिटल असोसिएशन यांना कळवावे अशी मागणी करण्यात यावेळी निवेदनात करण्यात आली आहे.सादर करतेवेळी महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय नाईकनवरे,संस्थापक उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर,संस्थापक सचिव अव्दैत चव्हाण,संस्थापक कोषाध्यक्ष सैफन शेख,संस्थापक सहसचिव अनुप फंड,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनायक शिंदे,महाराष्ट्र प्रदेश सचिव गोपाल वाढे,महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.प्रवीणकुमार सेलूकार,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष परवेज खान,महाराष्ट्र प्रदेश संघटक महादेव दरणे तसेच सदस्य आनंद भिमटे,कु.श्रुती कथे आदी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top