OSMANABAD पोलीस मुख्यालयात पोलीस पाटील यांचा सत्कार

0
उस्मानाबाद पोलीस मुख्यालयात पोलीस पाटील यांचा सत्कार 

उस्मानाबाद :- कोवीड - 19 साथीच्या काळात खेडेगावात प्रभावी कार्य करणा-या पोलीस पाटलांचा सत्कार समारंभ आज दि. 17/12/2020 रोजी पोलीस मुख्यालयातील अलंकार सभाग्रहात आयोजीत करण्यात आला. या प्रसंगी कोवीड -19 संबंधी मनाई आदेशांचे पालन व्हावे, गर्दी टाळावी या उद्देशाने त्यांना गटा-गटाने एकत्र बोलावुन प्रशस्ती पञ देवुन त्यांचा मा. पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आगामी काळात दि. 15/01/2021 रोजी उस्मानाबाद जिल्हयातील 428 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्याअनुषंगाने ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था या विषयावर मा. पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांनी पोलीस पाटील यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी  मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे, मा.परीविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक श्री. ॠषीकेश रावळे, मा. पोलीस उप अधीक्षक श्री. मोतीचंद राठोड यांसह पोलीस निरीक्षक संजय बाबर, दगुभाई शेख असे अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top