तुळजापूर येथे डिझेल चोरी करणारे दोघे अटकेत : tuljapur

0


तुळजापूर येथे डिझेल चोरी करणारे दोघे अटकेत

उस्मानाबाद ,  तुळजापूर: तुळजापूर पोलीस ठाण्याचे पो.नि. श्री मनोज राठोड हे आज दि. 26.12.2020 रोजी पहाटे पथकासह सांगवी मार्डी परिसरात पाहिजे व फरारी आरोपींच्या शोधार्थ कोम्बींग ऑपरेशन करत होते. दरम्यान अशोक लेलँड वाहन क्र. एम.एच. 25 एजे 1871 या वाहनास संशयावरुन पोलीसांनी थांबवले. या गाडीतील 1)शहाजी एकनाथ पवार, रा. येडशी 2)अर्जुन बापू काळे, रा. पारधी पिढी, ईटकुर, ता. कळंब यांच्या ताब्यात आढळलेल्या प्रत्येकी 500 लि. क्षमतेच्या तीन प्लास्टीक टाक्या व 20 लि. क्षमतेचे दोन प्लास्टीक कॅन व सुमारे 5 मी. लांबीची बांगडी नळी या साहित्यास डिझेलचा वास येत होता.

पथकाने अधिक माहिती घेतली असता तुळजापूर तालुक्यातील एका पेट्रोलियम विक्री केंद्राच्या भुमीगत टाकीतील डिझेल मध्यरात्रीच्या सुमारास उपसा करुन चोरी गेल्यावरुन तुळजापूर पो.ठा. गु.र.क्र. 431 / 2020 भा.दं.सं. कलम- 379 हा दाखल असल्याचे तसेच महामार्गालगत रात्री उभ्या असणाऱ्या वाहनांच्या इंधन टाकीतील डिझेल चोरीचे अनेक गुन्हे उस्मानाबादसह राज्यभरात दाखल असल्याचे समजले. यावर पथकाने त्या दोघांना अटक करुन नमूद वाहन व साहित्य जप्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top