तुळजापूरात चोरीच्या मोटारसायकलसह 1 संशयीत ताब्यात

0


तुळजापूरात चोरीच्या मोटारसायकलसह संशयीत ताब्यात 

उस्मानाबाद जिल्ह्यातील , पोलीस ठाणे, तुळजापूर: तुळजापूर पो.ठा. चे पथक दि. 31.12.2020 रोजी रात्री शहरात गस्तीस होते. यावेळी त्यांनी संशयावरुन प्रमोद छमु शिंदे, रा. सारोळा, ता. तुळजापूर या मोटारसायकल स्वारास अडवले. त्याच्या जवळील मो.सा. च्या मालकी- ताबा विषयी तो पोलीसांना समाधानकारक माहिती देउ न शकल्याने पथकाने मो.सा. चा चासी व इंजिन क्रमांकाच्या आधारे शोध घेतला असता ती मो.सा. चोरीस गेल्यावरुन नळदुर्ग पो.ठा. येथे गु.र.क्र. 272 / 2020 दाखल असल्याचे समजले. यावर पथकाने त्यास मो.सा. सह ताब्यात घेउन उर्वरीत कार्यवाहिस्तव नळदुर्ग पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top