उस्मानाबाद जिल्ह्यात 2 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल
पोलीस ठाणे, आनंदनगर: राज्य उत्पादन शुल्क पथकाने गुन्ह्यात जप्त केलेले वाहन क्र. एम.एच. 13 सीयु 1130 या हे उस्मानाबाद येथील मध्यवर्ती इमारत परिसरात लावलेले होते. त्या वाहनाची पुढील दोन्ही चाके दि. 30 व 31..12.2020 रोजीच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. यावरुन राज्य उत्पादन शुल्क चे पोलीस अंमलदार- महेंद्रकुमार गजधने यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, लोहारा: आमीन चांदसाब शेख, रा. औसा, जि. लातूर हे कुटूंबासह दि. 31.12.2020 रोजी 21.30 वा. औसा- जेवळी असा प्रवास ओम्नी क्र. एम.एच. 04 इएक्स 1788 ने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान देवधर देवी मंदीराजवळील रस्त्यावर एक मोटारसायकल व दगड रस्त्यावर आडवे असल्याने शेख यांनी कार थांबवली. यावेळी 3 अनोळखी व्यक्तींनी दगडफेक करुन शेख यांच्या कारच्या काचा फोडल्या व शेख यांच्या जवळील मोबाईल फोन हिसकावून घेण्यासाठी त्यांच्या हातावर दगडाने मारहाण केल्याने तो मोबाईल फुटून शेख यांच्या हाताची बोटे मोडली. अशा मजकुराच्या आमीन शेख यांनी आज दि. 01.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.