उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम येथे वडीलांच्या डोक्यात काठी मारल्याने खून !

0
उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम येथे वडीलांच्या डोक्यात काठी मारल्याने खून ! 

उस्मानाबाद जिल्ह्यातील , पोलीस ठाणे, भुम: धनराज रंगनाथ ठोंबरे, वय 50 वर्षे, रा. उमाचीवाडी, ता. भुम हे पत्नी- सुनिता हिला वेळोवेळी मारहाण करत असत तसेच दोन्ही मुले- विठ्ठल व प्रविण यांच्याशी भांडणे करत असत. दि. 31.12.2020 रोजी 21.00 वा. राहत्या घरी त्यांनी पत्नीसोबत विनाकारण भांडण करुन तीला मारहाण सुरु केली. ही मारहाण सोडवण्याचा प्रयत्न मुलगा- प्रविण व विठ्ठल यांनी केला परंतु वडील- धनराज ठोंबरे यांनी त्यांना जुमानले नाही. यावेळी वडीलांचा विरोध करतांना प्रविण याने रागाच्या भरात वडीलांच्या डोक्यात काठी मारल्याने ते जागीच मयत झाले. अशा मजकुराच्या धनराज ठोंबरे यांचे भाऊ- बापु ठोंबरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top