उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी , कळंब , तुळजापूर या 3 ठिकाणी मारहाण : गुन्हे दाखल

0



उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी , कळंब , तुळजापूर या 3 ठिकाणी मारहाण : गुन्हे दाखल 

पोलीस ठाणे, वाशी: विजोरा, ता. वाशी येथील खोसे कुटूंबीयांतील गोपीचंद पांडुरंग खोसे यांसह त्यांच्या कुटूंबीयांचा नातेवाईक- नवनाथ श्रीपती खोसे यांसह त्यांच्या कुटूंबीयांत दि. 30.12.2020 रोजी 09.00 वा. राहत्या गल्लीत घरासमोरील भुखंडावर मुरुम टाकल्याच्या कारणावरुन वाद झाला. यात दोन्ही कुटूंबांतील स्त्री- पुरुष सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबातील सदस्यांस शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्पविरोधी दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत 2 गुन्हे नोंदवले आहेत.

पोलीस ठाणे, कळंब: हरीदास महादेव ताटे, रा. मस्सा (खं.), ता. कळंब हे दि. 31.12.2020 रोजी 12.00 वा. गावातील ग्रामपंचायत गाळ्यासमोर बसले होते. यावेळी गावकरी- आश्रोबा मोरे यांनी तेथे येउन पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन ताटे यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहाण जखमी केले. पतीस होत असलेली मारहाण सोडवण्यास आलेल्या ताटे यांच्या पत्नीसही नमूद आरोपीने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या हरीदास ताटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, तुळजापूर: भुखंड वाटणीच्या कारणावरुन पती- पत्नी लिंबराज निवृत्ती सगट व उषाबाई रा. होनाळा, ता. तुळजापूर यांनी नातेवाईक- गोपाळ निवृत्ती सगट यांना दि. 31.12.2020 रोजी 19.30 वा. गावातील जि.प. शाळेसमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच भुखंड न वाटून दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या गोपाळ सगट यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top