उस्मानाबाद - नळदुर्ग - 10 हजार रुपयांची फसवणूक करणारे 24 तासांत अटकेत
पोलीस ठाणे, नळदुर्ग: जळकोट, ता. तुळजापूर येथील ‘उषानिल पेट्रोलियम विक्री केंद्र’ येथे दि. 12.01.2021 रोजी 01.00 वा. अर्टीगा कार क्र. एम.एच. 04 एफझेड 4290 ही इंधन भरण्यास आली. यावेळी कार मधील 6 तरुणांनी स्वाईप मशीनद्वारे पैसे देण्याच्या बहाण्याने कर्मचारी- प्रविण गायकवाड यांच्याकडून स्वाईप मशीन मागून घेउन गायकवाड यांना बोलण्यात गुंतवून ठेवले आणि त्या मशीन मधून आपल्या खात्यात 10,000 ₹ चे रिव्हर्स ट्रान्झॅकशन करुन घेतले. फसवणूकीचा हा प्रकार सकाळी 10.00 वा. संबंधीतांच्या लक्षात आला. हि खबर नळदुर्ग पो.ठा. यांना मिळताच तात्काळ गतीमान चक्रे फिरवण्यात येउन सीसीटीव्हीत दिसनाऱ्या अर्टीगा कारचे वर्णन बिनतारी संदेश यंत्रणे मार्फत जिल्हाभरात प्रसारीत करण्यात आले. ही कार नळदुर्ग- तुळजापूर रस्त्यावर नादुरुस्त असल्याची खबर मिळताच पथकाने 16.00 वा. सु. छापा टाकून कारसह 1)विजय धोंडीराम सुर्यवंशी 2)नितीन आनंद भिडे 3)आशपाक दस्तगीर शेख 4)सोहम लक्ष्मीकांत पाटील 5)ज्ञानेश्वर गंजेराम नरोडे 6)सचिन भाऊलाल पाटील, सर्व रा. नाशिक यांना ताब्यात घेतले आहे.