उस्मानाबाद जिल्ह्यात 5 ठिकाणी चोरी : गुन्हा दाखल

0



 उस्मानाबाद जिल्ह्यात 5 ठिकाणी चोरी : गुन्हा दाखल 

पोलीस ठाणे, मुरुम: शरणप्पा मेनसे, रा. मुरुम यांच्या घरात त्यांचा मित्र गुंडप्पा बसवप्पा पोमाजी, रा. अक्कलकोट हा दि. 10 व 11.01.2021 दरम्यानच्या रात्री खोलीचा दरवाजा उघडा ठेउन झोपला होता. ही संधी साधून अज्ञाताने खोलीतील खुर्चीवर ठेवलेल्या विजारीच्या खिशातील 45,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या गुंडप्पा पोमाजी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, भुम: अमर राम पिंगळे, रा. बावी, ता. भुम यांच्या अंगनातील पॉप्युलर डिलक्स नांगर व गावातील इंडस कंपनीच्या भ्रमणध्वनी मनोऱ्या खालील यंत्रणा खोलीतील आमार राजा कंपनीच्या 24 बॅटऱ्या अज्ञाताने दि. 10 व 11.01.2021 दरम्यानच्या रात्री चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या अमर पिंगळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, आनंदनगर: माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञाताने तोडून आतील विविध कंपन्यांचे तयार कपडे, सदरे- विजारी असा एकुण 39,750 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या दुकान मालक- सार्थक अंबुरे, रा. उस्मानाबाद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, परंडा: अजहर पठाण, रा. समतानगर, परंडा यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर क्र. एम.एच. 25 एआर 6280 ही दि. 10.01.2021 रोजी राहत्या घरा बाहेर लावली होती. ती दुसऱ्या दिवशी सकाळी लावल्या जागी आढळली नसल्याने ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या त्यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, परंडा: वाहेद मुकबील, रा. माणकेश्वर, ता. परंडा यांच्या शेतातील शेडमधील 12 बोकड व 6 शेळ्या अज्ञाताने दि. 10 व 11.01.2021 दरम्यानच्या रात्री चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या वाहेद मुकबील यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top