उस्मानाबाद जिल्ह्यात 2 ठिकाणी चोरी गुन्हे दाखल

0

उस्मानाबाद जिल्ह्यात 2 ठिकाणी चोरी गुन्हे दाखल

* पोलीस ठाणे, कळंब: डिकसळ, ता. कळंब येथील अंगणवाडी क्र. 45 च्या दरवाजाचा कडी- कोयंडा दि. 02 ते 04.01.2021 रोजीच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने तोडून आतील हिंदुस्थान पेट्रोलियमचे 2 एलपीजी टाक्या चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या अंगणवाडी सेविका- श्रीमती मिरा लिमकर यांनी काल दि. 05.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

* पोलीस ठाणे, ढोकी: तेर, ता. उस्मानाबाद येथील लॅपटॉप- मोबाईल फोन दुरुस्ती दुकानाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 04 व 05.01.2021 दरम्यानच्या रात्री तोडून आतील लेनोवो कंपनीचे 2 लॅपटॉप, सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल फोन व 22,000 ₹ रोख रक्कम असा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या ग्राहक सेवा केंद्र चालक- संदीप रघुनाथ कचरे, रा. तेर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top