उस्मानाबाद जिल्ह्यातील 3 ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल ..

0

उस्मानाबाद जिल्ह्यातील 3 ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल ..

* पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): शिंदेवाडी, ता. उस्मानाबाद येथील सुनिता व अर्जुन रामचंद्र मंजुळे या दोघ पती- पत्नींना दि. 08.01.2021 रोजी 18.00 वा. सु. राहत्या घरासमोर वडीलोपार्जीत शेतजमीनीच्या वाटणीच्या कारणावरुन भाऊबंद- पिराजी रामचंद्र मंजुळे, बाबु मंजुळे, ललीता मंजुळे, वर्षा मंजुळे यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच उपरोक्त नमूद पती- पत्नींना ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अर्जुन मंजुळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

* पोलीस ठाणे, ढोकी: ज्ञानदेव महादेव ढेकणे, रा. कौडगाव (बावी), ता. उस्मानाबाद हे दि. 08.01.2021 रोजी 05.00 वा. सु. गावातील आपल्या शेतात असतांना पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुने भाऊ- तुकाराम ढेकणे यांनी लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केले. या मारहाणीत ज्ञानदेव यांच्या जबड्यास मार लागून दात पडला. अशा मजकुराच्या ज्ञानदेव ढेकणे यांनी काल दि. 09.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

* पोलीस ठाणे, लोहारा: महेश महादेव मुळे, रा. हिप्परगा (रवा), ता. लोहारा हे दि. 09.01.2021 रोजी 09.30 वा. सु. गावातील गणपती लोमटे यांच्या शेतातून ट्रॅक्टर- ट्रेलरमध्ये ऊस वाहुन नेत होते. यावेळी ट्रॅक्टरच्या रहदारीच्या कारणावरुन शेत शेजारी- कृष्णात लोमटे, श्रीनीवास लोमटे, आगतराव लोमटे, अनिता लोमटे यांनी महेश मुळे यांचे ट्रॅक्टर आडवून ट्रॅक्टरवर दगडफेक केली. तसेच महेश मुळे यांना शिवीगाळ करुन एअर गनचा व कोयत्याचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या महेश मुळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 504, 506, 34 आणि म.पो.का. कलम- 135 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top