उस्मानाबाद जिल्ह्यात 3 ठिकाणी अपघात : 2 मृत्यू , 1 गंभीर जखमी ..

0


उस्मानाबाद जिल्ह्यात 3 ठिकाणी अपघात : 2 मृत्यू , 1 गंभीर जखमी ..

* पोलीस ठाणे, आनंदनगर: बाबु विठोबा रणखांब, वय 80 वर्षे, रा. उस्मानाबाद हे दि. 28.12.2020 रोजी 15.00 वा. सु. उस्मानाबाद येथील तेरणा महाविद्यलासमोरील रस्त्याने पायी चालत जात असतांना अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोराजी धडक दिली. या अपघातात बाबु रणखांब हे गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकाने घटनास्थळावरुन वाहनासह पलायन केले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- पोपट बाबु रणखांब यांनी काल दि. 09.01.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 338 आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

* पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): जयंत विष्णुपंत कुलकर्णी, रा. गणेशनगर, उस्मानाबाद हे दि. 29.12.2020 रोजी 06.45 वा. सु. उस्मानाबाद येथील राजधानी हॉटेल समोरील रस्त्याने मॉर्निंग वॉक करत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने ऑटोरिक्षा क्र. एम.एच. 25 एके 0411 हा निष्काळजीपणे चालवून जयंत कुलकर्णी यांना पाठीमागुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या जयंत कुलकर्णी यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

* पोलीस ठाणे, कळंब: गणेश सुरेश शेळके, वय 27 वर्षे, रा. खामसवाडी, ता. कळंब हे दि. 21.11.2020 रोजी 22.00 वा. सु. कळंब येथील ढोकी- कळंब रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 6807 ही चालवत जात असतांना अज्ञात मिनीट्रकने त्यांना पाठीमागुन जोराची धडक दिली. या अपघातात गणेश शेळके हे गंभीर जखमी झाल्याने वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- सुनिल शेळके यांनी काल दि. 09.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top