मी एसबीआय क्रेडीट कार्ड विभागातून बोलतो म्हणून हवालदाराची 17,500 रुपयांची फसवणूक
उस्मानाबाद :- पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): सीमा सुरक्षा दलात हवालदार असलेले उस्मानाबाद येथील रहिवासी- मारुती बजरंग बोंदर, हे गावी सुटीवर आले आहेत. दि. 19.11.2020 रोजी 14.00 वा. सु. त्यांच्या भ्रमणध्वनीवर कॉल करणाऱ्या अज्ञाताने “मी एसबीआय क्रेडीट कार्ड विभागातून बोलत असून तुमच्या कार्डचे नुतनीकरण करण्यासाठी कार्डवरील क्रमांकाची माहिती द्या.” असे सांगीतले. यावर मारुती बोंदर यांनी या प्रकाराची सत्यता- खात्री न करता आपल्या क्रेडीट कार्डवरील क्रमांक त्या अज्ञात व्यक्तीस सांगीतले. यावर बोंदर यांच्या भ्रमणध्वनीवर आलेला ओटीपी क्रमांक त्या समोरील व्यक्तीने विचारला. बोंदर यांनी तो संदेश वाचून- समजावून न घेता त्यातील ओटीपी क्रमांक त्या अज्ञातास सांगीतला असता 17,500 ₹ रक्कमेची क्रेडीट कार्डद्वारे खरेदी केल्याचा संदेश त्यांच्या भ्रमणध्वनीवर आला. अशा मजकुराच्या मारुती बोंदर यांनी दि. 09.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.