उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब ,ढोकी , शिराढोण या 3 ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल

0


उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब ,ढोकी , शिराढोण या 3 ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल 

पोलीस ठाणे, कळंब: भोगजी, ता. कळंब येथील बाळासाहेब व कविता खराटे हे दोघे पती- पत्नी त्यांची बालके शेजारील नातेवाईक- राजश्री खराटे यांच्या अंगनात शौचास बसवतात. याचा जाब राजश्री खराटे यांनी दि. 01.01.2021 रोजी 07.00 वा. त्या दोघा पती- पत्नीस विचारला असता त्यांनी राजश्री यांना शिवीगाळ करुन लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या राजश्री खराटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, ढोकी: श्रीराम दिलीप गडदे, रा. येवती, ता. उस्‍मानाबाद यांनी गावकरी- रविकुमार शिवाजी ढेकळे यांच्या घरासमोर दि.30.12.2020 रोजी 20.30 वा. जाउन पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन रविकुमार यांना मोठ- मोठ्याने शिवीगाळ करुन व दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रविकुमार ढेकळे यांनी काल दि. 01.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, शिराढोण: झुंबर लक्ष्मण कसबे, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद हे दि. 29.12.2020 रोजी 11.00 वा. बोरगांव येथील स्वत:च्या शेतात होते. यावेळी बोरगांव येथील रहिवासी- बालाजी लोंढे, सुरेखा लोंढे, अतुल लोंढे, संभाजी लोंढे, आकाश लोंढे यांनी कसबे यांच्या शेतात जाउन कसबे यांना शेतजमीन वहीवाट करण्यास अडथळा करुन, “तुम्ही येथे यायचे नाही,” असे धमकावून ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या झुंबर कसबे यांनी काल दि. 01.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 147, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top