उस्मानाबाद जिल्ह्यात येरमाळा , कळंब , तुळजापूर या 3 ठिकाणी मारहाण गुन्हा दाखल

0

उस्मानाबाद जिल्ह्यात येरमाळा , कळंब , तुळजापूर या 3 ठिकाणी मारहाण गुन्हा दाखल 

पोलीस ठाणे, कळंब: “तु आमच्या घराच्या पत्र्यास लाथ का मारली.” असा जाब शशिकला बिक्कड, रा. बहुला, ता. कळंब यांनी शेजारचे नातेवाईक- सुषमा बिक्कड यांना दि. 26.12.2020 रोजी विचारला. याच्या रागातून सुषमा बिक्कड, शिवाजी बिक्कड, मंगल बिक्कड, बालाजी बिक्कड यांनी शशिकला यांसह त्यांचे पती- आण्णासाहेब बिक्कड, मुलगा- प्रविण व मुलगी- सोनाली यांना शिवीगाळ करुन लोखंडी गज, दगड, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी करुन ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत आण्णासाहेब बिक्कड यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले. अशा मजकुराच्या आण्णासाहेब बिक्कड यांनी काल दि. 02.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, तुळजापूर: रविकुमार दयानंद चितळे, रा. अमृतवाडी, ता. तुळजापूर हे दि. 02.01.2021 रोजी 13.30 वा. आपल्या घरासमोर असतांना आराधवाडी, तुळजापूर येथील बालाजी गायकवाड व पिल्ल्या गायकवाड यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करुन जखमी केले. यावेळी रविकुमार यांच्या बचावाचावास त्यांची आई व पत्नी सरसावली असता त्या दोघींनाही नमूद दोघांनी लाथाबुक्क्यांनी माहराण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रविकुमार चितळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, येरमाळा: निवृत्ती चांगदेव बांगर, रा. बांगरवाडी, ता. कळंब यांना भाऊबंद- बळीराम दत्तु बांगर यांनी दि. 30.12.2020 रोजी 08.30 वा. गावातील बांगर किराणा दुकानासमोर पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन व लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले आणि ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या निवृत्ती बांगर यांनी काल दि. 02.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top