उस्मानाबाद जिल्ह्यात 2 ठिकाणी अपघात : गुन्हे दाखल

0




उस्मानाबाद जिल्ह्यात 2 ठिकाणी अपघात : गुन्हे दाखल 

पोलीस ठाणे, नळदुर्ग: चालक- संजय लिंबराज कोरेकर (लोमटे), रा. सलगरा (दि.), ता. तुळजापूर यांनी सलगरा- किलज रस्त्यावर दि. 28.12.2020 रोजी 16.30 वा. सु. होंडा शाईन मोटारसायकलवर लोखंडी नळ धोकादायकरित्या आडवा ठेउन निष्काळजीपणे चालवली. यावेळी मो.सा. क्र. एम.एच. 25 एस 8050 चे चालक- प्रकाश मोतीराम शिंदे, रा. किलज, ता. तुळजापूर यांना त्या नळाचा धक्का लागल्याने त्यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले आहे. अशा मजकुराच्या प्रकाश शिंदे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, आनंदनगर: चालक- सुर्यप्रकाश पंचिलाल साकेत, रा. उस्मानाबाद यांनी टिप्पर क्र. एम.एच. 25 यु 1464 हा दि. 02.01.2021 रोजी 18.30 वा. तुळजापूर- येडशी राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर निष्काळजीपणे चालवल्याने टिप्पर रस्ता दुभाजकास धडकला. यावरुन आनंदनगर पो.ठा. चे पोना- ओमप्रकाश मैंद्रे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279 अंतर्गत चालकाविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top