उस्मानाबाद, तुळजापूर या 2 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल - osmanabad
पोलीस ठाणे, तुळजापूर: अतुल साठे, रा. तुळजापूर यांच्या तुळजापूर शहरातील प्लंबींग साहित्य दुकानाचा पाठीमागील पत्रा दि. 02 व 03.01.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात चोरट्याने कापून दुकानातील शार्प व लक्ष्मी कंपनीच्या प्रत्येकी अर्धा अश्वशक्ती क्षमतेचे 5 विद्युत पंप, फ्रिवेल, मोजनी टेप, जग्वार कंपनीच्या नळाच्या तोट्या व सिंक भांडे असे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या अतुल साठे यांनी आज दि. 03.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, आनंदनगर: ज्ञानेश्वर कोळी, रा. उस्मानाबाद यांनी त्यांची हिरो होंडा मो.सा. क्र. एम.एच. 13. बीएक्स 6771 ही दि. 01.01.2021 रोजी 15.30 वा. तुळजाभवानी क्रिडा संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ लावली होती. ती 17.15 वा. लावल्या जागी आढळली नसल्याने अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर कोळी यांनी आज दि. 03.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.