सार्वजनिक मालमत्तेचे ( ई टॉयलेट ) नुकसान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
उस्मानाबाद : जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बसस्थानका मधील शॉपिंग सेंटरमध्ये नगरपालिका आरक्षण क्र. 32 / 33 मध्ये शासकीय निधीमधुन ई टॉयलेटचे बेसमेंट बांधण्यात आले होते. ते बेसमेंट दि. 02.01.2021 रोजी 12.00 वा. सु. एक्सकॅव्हेटर यंत्र क्र. एम.एच. 25 सी 5325 चे चालक- मालक व अन्य व्यक्तींनी एक्सकॅव्हेटर यंत्राद्वारे उध्दवस्त करुन सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे 1,00,000 ₹ चे नुकसान केले. अशा मजकुराच्या लक्ष्मीकांत वाघमारे, यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीतांविरुध्द भा.दं.सं. कलम- 427, 34 आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.