वाशी तालुक्यात अवैध मद्य विक्री करणाऱ्या 4 ठिकाणी छापे
पोलीस ठाणे, वाशी: अवैध मद्य विक्री होत असल्याच्या खबरेवरुन वाशी पो.ठा. च्या पथकाने दि. 02.01.2021 रोजी पो.ठा. हद्दीत वेगवेगळ्या चार ठिकाणी छापे मारले.
* पहिल्या घटनेत फुलाबाई शिंदे, रा. गोजवाडा, ता. वाशी या गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासमोर एका कॅनमध्ये 10 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 850 ₹) बाळगल्या असतांना आढळल्या.
* दुसऱ्या घटनेत आक्काबाई शिंदे, रा. शेंडी फाटा, ता. वाशी या राहत्या घराजवळ एका कॅनमध्ये 9 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 680 ₹) बाळगल्या असतांना आढळल्या.
* तिसऱ्या घटनेत संभाजी भोसले, रा. ईट, ता. भुम हे एका पिशवीत 180 मि.ली. देशी दारुच्या 11 बाटल्या (किं.अं. 572 ₹) ईट शिवारातील ‘गारवा हॉटेल’ च्या बाजूस अवैधपणे बाळगले असतांना आढळले.
* चौथ्या घटनेत कालिंदा पवार, रा. लोणखरा पारधी पिढी, ता. वाशी या एका कॅनमध्ये 10 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 820 ₹) भीमाशंकर कारखाना परीसरात बाळगल्या असतांना आढळल्या.
यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुद म.दा.का. अंतर्गत वाशी पो.ठा. येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदवले आहेत.