उस्मानाबाद - निलेगावातील ( दिव्यांग ) तुकाराम कदम यांनीन सर केले कळसूबाई शिखर

0
 निलेगावातील ( दिव्यांग ) तुकाराम कदम यांनीन सर केले कळसूबाई शिखर 

 २० जिल्ह्यातील ७० दिव्यांग झाले होते सहभागी : नववर्षाच्या प्रारंभी राबविला उपक्रम

उस्मानाबाद  ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर पोहोचून महाराष्ट्रातील २० जिल्ह्यातील ७० दिव्यांगबांधवांनी नववर्षाचे स्वागत केले. शिखर सर करणाऱ्यांमध्ये उस्मानाबाद जिल्हातील निलेगावातील तुकाराम कदम यांच्या समावेश आहे . अनेकांनी फक्त शिकताना अभ्यासक्रमात वाचलेले कळसूबाई शिखर प्रत्यक्षात चढण्याची यशस्वी मोहीम निलेगावातील तुकाराम कदम यांनी पूर्ण केली आहे. 


दिव्यांगांच्या इच्छाशक्तीला शिवुर्जा प्रतिष्ठानची जोड मिळाली . त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाल्याचे मत या मोहिमेत सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवांनी व्यक्त केले . गेल्या आठ वर्षांपासून यशस्वीपणे महाराष्ट्रातील दिव्यांगांना दरवर्षी शिवुर्जा प्रतिष्ठानच्या वतीने ही संधी उपलब्ध करून देण्यात येते . या मोहिमेत कळसूबाई शिखर सर करणारे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील दिव्यांग बांधव सहभागी झालेले सर्व दिव्यांग कळसूबाईच्या पायथ्याशी जहाँगीरदारवाडी या गावात एकत्र आले होते . 
३१ डिसेंबरला दुपारी २ वाजता सर्वानी कळसूबाई शिखर चढाईला सुरुवात केली , छत्रपती शिवाजी महाराज की जय , हर हर महादेव , कळसूबाई माता की जय अशा घोषणा देत दिव्यांगांनी शिखर चढाईसाठी कूच केले . या मोहिमेत सहभागी स्त्री व पुरुष दिव्यांग एकमेकांना आधार देत होते . रात्री ७ वाजता सर्वांनी कळसूबाई शिखरावर मुक्काम ठोकला . शिखराचा माथा गाठला . शिखरावर असलेल्या कडाक्याच्या थंडीत व सोसाट्याच्या वाऱ्यात सर्वांनी तंबूमध्ये नववर्षाच्या पहाटे म्हणजे १ जानेवारीला माथ्यावर असणाऱ्या कळसूबाई मंदिरात त्यांनी कळसूबाईचे दर्शन घेतले . तसेच उगवत्या सर्याला नमस्कार करीत सर्व प्राणिमात्राला सुखी ठेव असे साकडे घातले . त्यानंतर सकाळी १० वाजता परतीची वाट धरत खाली उतरण्यासाठी सुरुवात केली . दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांनी जहाँगीरदारवाडी गाव गाठले . विविध प्रकारचे दिव्यांग यात सहभागी झाले होते . सर्व सहभागी दिव्यांगांना शिवुर्जा प्रतिष्ठानच्या वतीने कळसूबाई शिखर यशस्वीपणे सर केल्याबद्दल प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले . उपक्रमात सहभागींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे .




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top