उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी उमरगा येथे 3 ठिकाणी कारवाई

0


उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी उमरगा येथे 3 ठिकाणी कारवाई

* पोलीस ठाणे, उमरगा: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन उमरगा पो.ठा. च्या पथकाने दि. 08.01.2021 रोजी पो.ठा. हद्दीत वेगवेगळ्या तिन ठिकाणी छापे मारले.

* पहिल्या घटनेत ईस्माईल हणमंत कांबळे, रा. तुरोरी, ता. उमरगा हे गावातील ‘प्रतिक्षा हॉटेल’ समोर कल्याण मटका जुगार साहित्य व 450 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले.

* दुसऱ्या घटनेत शिवाजी नामदेव सास्तुरे, रा. धाकटीवाडी, ता. उमरगा हे तलमोड तपासनाका जवळील ‘कन्हैया हॉटेल’ समोर कल्याण मटका जुगार साहित्य व 740 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले.

* तिसऱ्या घटनेत दगडू पांडुरंग सगर, रा. झोपडपट्टी, उमरगा हे डिग्गी येथल बसस्थानकाजवळ कल्याण मटका जुगार साहित्य व 810 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top