500 रुपात न्युज पोर्टल धारकांना करंटखाते उघडण्यासाठी परवानगी द्यावी : MDMA ची रिजर्व बैंक ऑफ इंडियाकडे निवेदनाद्वारे विनंती
महाराष्ट्र :- भारत देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेमध्ये डिजिटल मीडिया क्षेत्रातील न्यूज़ पोर्टल पत्रकार संपादक यांना करंट खाते 500 रुपयात उघडण्यासाठी मुभा द्यावी अशी विनंती
महा डिजिटल मीडिया असोसिएशन ( MDMA ) ने
भारत देशाचे पंतप्रधान महोदय व रिजर्व बैंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महा डिजिटल मीडिया असोसिएशन ( MDMA ) संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय नाईकनवरे , संस्थापक सचिव अद्वैत चव्हाण , महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनायक शिंदे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनात आम्ही महा डिजिटल मीडिया असोसिएशन ( स्व नियामक संस्था ) ही भारत देशातील व महाराष्ट्र राज्यातील पहिली संस्था पत्रकार संपादक यांचेसाठी केंद्र सरकारचे नियम व अटीनुसार स्थापन केली आहे . केंद्र सरकार द्वारा न्यूज़ पोर्टल पत्रकारांना मान्यता दिली आहे . याला अनुसार आम्ही डिजिटल मीडिया क्षेत्रातील सर्व पत्रकार व संपादक देशातील वेगवेगळ्या राज्यातील सभासद या संस्थेमध्ये सहभागी झालो आहे . डिजिटल न्यूज पोर्टल धारकांना व्यवहार करणेसाठी महाराष्ट्र राज्यातील बँकेत न्यूज पोर्टल यांना करंट खाते उघडावयाचे आहे . मात्र महाराष्ट्र राज्यातील विविध राष्ट्रीयकृत बँकेत करंट खाते उघडण्यासाठी ५ हजार ते १० हजार रुपये डिपाझीट ठेवावे लागत असल्याचे बँकेतून सांगितले जात असून एवढे जादा पैसे न्यूज पोर्टल पत्रकार व संपादक यांचेकडे नसल्याचे निवेदनात संस्थेचेवतीने निवेदनात म्हटले आहे .
डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असणारे पत्रकार व संपादक न्यूज पोर्टल यांना केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्याही प्रकारची जाहिरात देत नाही . न्यूज पोर्टल धारकांना स्वतः आर्थिक प्राप्ती करणेसाठी जाहिरातीचे माध्यमातून उत्पन्न मिळणे आवश्यक आहे . न्यूज पोर्टल धारकांनी पोर्टल बनिवणेव डोमैन खरदी करणेसाठी आर्थिक गुंतवणूक केली आहे . तरी आता न्यूज पोर्टल धारक पत्रकार यांना आता जादा गुंतवणूक करणे शक्य नसल्याने रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी आपल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांना न्यूज पोर्टल धारक पत्रकार संपादक यांना ५०० रुपयांमध्ये करंट खाते उघडून देण्यासाठी सुचित करावे किंवा परवानगी देणेबाबत महा डिजिटल मीडिया असोसिएशन ( MDMA ) ने रिजर्व बैंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
गेल्या वर्षी पुर्ण जगाला वेळा घातलेल्या कोरोना महामारी मुळे भारत देशातील नव्हे तर पुर्ण जगातील व्यवसाय ठप्प झाले होते. अधिक काळ व्यवसाय बंद असल्याने अनेक व्यवसाय जगभरातील बंद पडण्याच्या मार्गावर आले असताना डिजिटल मीडियाला खाजगी जाहिराती मिळणे बंद झाले आहे . त्यामुळे डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल धारकांन समोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. काही जाहिरात दार ग्राहक पुढील १ , २ महिन्याचे चेक देत आहेत . चेक वटण्यासाठी बँकेत करंट खाते आवश्यक आहे . या बाबीची दखल घेवून न्यूज पोर्टल संपादक यांना न्यूज पोर्टल नावाने करंट खाते काढणेसाठी ५०० रुपये आकारले जावेत अशी विनंती निवेदनात MDMA कडुन करण्यात आली आहे .