लातुर येथे अज्ञान रोगाने कोंबड्या दगावल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0
                ( फोटो संग्रहीत आहे )

लातुर येथे अज्ञान रोगाने कोंबड्या दगावल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

लातूर-  लातूर जिल्ह्यातल्या केंद्रेवाडी येथे अज्ञात आजाराने जवळपास ४०० कोंबड्या दगावल्याची घटना घडली आहे.  या कोंबड्या नेमक्या कोणत्या आजाराने दगावल्या याचं निदान लागत नसल्याने, जिल्हा प्रशासनाने केंद्रेवाडी पासून दहा किलो मीटर क्षेत्राला अलर्ट झोन जाहीर केलं आहे . दगावलेल्या कोंबड्याना जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करून पुरण्यात आले आहे . 

कोरोनाच्या पाठोपाठ आता बर्ड फ्लू ने काही राज्यात तोड वर काढल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत असताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील पोल्ट्री फार्म उद्योग करणाऱ्या  व्यावसायिकांवर मोठे संकट येण्याची भीती निर्माण झाली आहे. कोरोना आल्याबरोबर अनेक अफवा पसरल्या होत्या त्यामध्ये पोल्ट्रीफार्म चालक मोठ्या संकटात सापडले होते मोठे नुकसान ही सहन करावे लागले होते व आफवान मुळे दर कमी झाला होता तर काही ठिकाणी कोंबड्या फुकट वाटलेल्या च्या पोस्ट देखील पाहायला मिळाल्या होत्या..
 
   लातुर येथे केंद्रेवाडी इथं सदाशिव केंद्रे यांनी नव्याने पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरु केला होता. त्यासाठी त्यांनी ८०० कोंबड्यांची पिल्लं अहमदनगर येथून आणली होती.  दोन महिन्यांपासून ते या कोंबड्यांचा सांभाळ करीत होते.  मात्र काल पासून अचानक कोंबड्या अशक्त होऊन जमिनीवर पडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.  ह्या दोन दिवसाच्या कालावधीत साधारण 400 कोंबड्या दगावल्या असल्याचं सदाशिव केंद्रे यांनी सांगितले. या घटनेमुळे जिल्हा प्रशासनाने लोकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे.  कोंबड्यांच्या मृत्यूचे निदान लावण्यासाठी कोंबड्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहे. तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन या पोल्ट्रीफार्मला भेट देवुन घडलेल्या प्रकाराची पाहणी केली आहे.  निमोनिया सारख्या आजाराने या कोंबड्या दगावल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   

अशी माहिती RNO वृत्तसंस्थेने फेसबुक पेजवर प्रकाशीत केली आहे व यूट्यूब चैनल वर याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top