उस्मानाबाद जिल्ह्यात 5 ठिकाणी चोरी गुन्हा दाखल - theft

0



उस्मानाबाद जिल्ह्यात 5 ठिकाणी चोरी गुन्हा दाखल - theft

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): विष्णु रामचंद्र माने, रा. तुळजापूर हे 23 जानेवारी रोजी 21.00 वा. मोटारसायकलने जात असतांना लघुशंकेसाठी तुळजापूर रस्त्यावरील तेरणा अभियांत्रीकी महाविद्यालयासमोर थांबले होते. यावेळी पाठीमागू आलेल्या मो.सा. क्र. एम.एच. 25- 5845 वरील दोन अज्ञात पुरुषांनी विष्णु माने यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्यासह पाठीवरील बॅगची झडती घेउन त्यांच्या अंगावरील 10 ग्रॅम सोन्याची साखळी, स्मार्टफोन, मनगटी घड्याळ व 21,300 ₹ रोख रक्कम हिसकावून घेतली. जातांना ते दोघे माने यांच्या मोटारसायकलची किल्ली सोबत घेउन गेले. अशा मजकुराच्या विष्णु माने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, ढोकी: मारुती पांडुरंग गोचडे, रा. चनई, ता. अंबेजोगाई यांनी त्यांची हिरो पॅशन प्रो. मोटारसायकल क्र. एम.एच. 44 एम 4165 ही 23 जानेवारी रोजी 18.30 वा. सु. घोगरेवाडी शिवारातील ‘हॉटेल सुर्या’ समोर लावली होती. मो.सा. लावल्या ठिकाणी ते 19.15 वा. आले असता ती त्यांना न आढळल्याने अज्ञाताने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या मारुती गोचडे यांनी 24 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, मुरुम: लक्ष्मण बलभीम पाटील, रा. कंटेकुर, ता. उमरगा यांच्या कंटेकुर गट क्र. 161 मधील शेतातील खोलीची भिंत अज्ञाताने 12 व 13 जानेवारी दरम्यानच्या रात्री पाडून आतील लक्ष्मी कंपनीचा 3 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप, 20 फुटी लोखंडी गज व 12 पार्टीशन पत्रे  चोरुन नेले. अशा मजकुराच्या लक्ष्मण पाटील यांनी 24 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): रावसाहेब वामन कांबळे, रा. मेडसिंगा, ता. उस्मानाबाद हे आपली होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएन 0018 ही 13 जानेवारी रोजी 20.00 वा. उस्मानाबाद शहरातील छात्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्या बाजूस लावून खरेदीसाठी दुकानात गेले होते. मो.सा. लावल्या ठिकाणी परतल्यावर त्यांना मो.सा. आढळली नसल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या रावसाहेब कांबळे यांनी 24 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, कळंब: सुनिल शहाजी निर्मळ व संजय मालपानी, दोघे रा. कळंब हे 24 जानेवारी रोजी 10.30 वा. सु. कळंब शहरातील साप्ताहीक बाजारात बाजार करत असतांना गर्दीचा फायदा घेउन अज्ञाताने त्या दोघांच्या सदऱ्याच्या खिशातील रेडमी 9 प्रो व वनप्लस असे दोन भ्रमणध्वनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या सुनिल निर्मळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top