Osmanabad जिल्ह्यात 3 ठिकाणी अपघात : Accident
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): चालक- अमर अनंत पाटील, रा. लासोना, ता. उस्मानाबाद यांनी दि. 08.12.2020 रोजी 21.15 वा. सु. सकनेवाडी, ता. उस्मानाबाद शिवारातील सुत गिरणी जवळ मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एआर 7965 ही निष्काळजीपणे चालवल्याने घसरली. या अपघातात स्वत: अमर पाटील हे जखमी झाले तर त्यांच्या पाठीमागे बसलेला भाऊ- अतुल अनंत पाटील, वय 30 वर्षे, हे खालीपडून गंभीर जखमी होउन मयत झाले. या अकस्मात मृत्यु प्रकरणी फौ.प्र.सं. कलम- 174 अंतर्गत चौकशी दरम्यान मयताची पत्नी- अश्विनी अतुल पाटील यांनी दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, तुळजापूर: चालक- महेंद्र बरय्या देवापल्ली, रा. हैंद्राबाद यांनी 24 जानेवारी रोजी 11.30 वा. सु. तुळजार- नळदुर्ग रस्त्यावरील तिर्थ (बु.) फाटा येथे अर्टीगा कार क्र. टी.एस. 07 एचबी 7687 ही निष्काळजीपणे, हयगईने चालवून तानाजी गेनदेव कदम, रा. 27 वर्षे, रा. चिंचोली, ता. तुळजापूर हे चालवत असलेल्या मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एई 9271 ला समोरुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या गणेश भानुदास कदम, रा. चिंचोली यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, बेंबळी: करजखेडा, ता. उस्मानाबाद येथील आकाश धनाजी हुलगुंडे हे 06 जानेवारी रोजी 10.00 वा. पाटोदा- लोहारा रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एई 7105 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने हिरो स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 24 बीई 3252 ही निष्काळजीपणे चालवून आकाश हुलगुंडे यांच्या मो.सा. ला पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे पिता धनाजी गोपाळ हुलगुंडे यांनी 24 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.